पत्रकारांना संरक्षण म्हंजे चोरांना संरक्षण
गुन्हेगारांप्रमाणे आज पत्रकारितेच्या टोळ्या बनल्या व राजकारण्यांप्रमाणे गट झाले. हे सगळे डे यांच्या हत्येनंतर एकत्र आले. डे यांच्याप्रमाणे उद्या आपलेही रक्त सांडेल या भयाने ते एकत्र आले.
जे पत्रकार गुन्हेगार टोळीचे व पोलिसांचे हस्तक बनले त्यांनी पत्रकारितेचे कवच पांघरून केलेली पापेच त्यांच्यावर उलटली! याची बरीच उदाहरणे आहेत.
पण एकंदरीत सध्याच्या पत्रकारितेकडे नजर टाकली तर मन विषण्ण होते. आजची पत्रकारिता म्हणजे एकाकडून सुपारी घेऊन दुसर्याच्या विरुद्ध विष उगाळायचे, राजकीय चाटूगिरी आणि एखाद्यास नेस्तनाबूत करण्यासाठी कोणत्याही थराला जाणे. लोकशाही राजवटीत वृत्तपत्र आणि प्रसिद्धिमाध्यमांची भूमिका कोणती असावी याचे भान कुणालाच उरलेले नाही. वृत्तपत्रांची भूमिका सरकारची किंवा राजकारण्यांची अनधिकृत प्रसिद्धी खाते बनण्याची नसून जनतेच्या व्यथा सार्वजनिक वेशीवर टांगणे, सरकारी धोरणातील उणिवांवर नेमके बोट ठेवणे, मस्तवाल सत्ताधीशांवर अंकुश ठेवणे ही प्रमुख कामे आहेत वृत्तपत्रांची आहेत, पण ही कामे चोख बजावली जात आहेत काय?
जिद्दीने पत्रकारितेस वाहून घेणार्यांचा काळ आता उरलेला नाही. लोकमान्य टिळक हे राजकारणात होते. पण त्यांनी स्वत:चे राजकारण पुढे रेटण्यासाठी व राज्यकर्त्यांची चमचेगिरी करण्यासाठी 'केसरी' काढला नाही व वापरला नाही.
आज देशातील 100 टक्के वृत्तपत्रे राजकीय नेत्यांच्या मालकीची आहेत. टीव्ही चॅनल्स भांडवलदार व राजकीय नेत्यांच्या मालकीची आहेत व सर्व पत्रकार म्हणवून घेणारे या राजकीय भांडवलदारांचे नोकर आहेत. आज वृत्तपत्र विकले जात नाही तर ते भांडवलदारांच्या काळ्या पैशांच्या पाठबळावर फुकट वाटले जाते. वृत्तपत्राचा मालक एक हजार कोटी रुपये खर्चून जाहिरातबाजी व विक्रीच्या योजना राबवतात . मालक राजकीय पुढारी किंवा राजकारण्यांचे मिंधे असल्यामुळे त्या वृत्तपत्रांत काम करणार्यांच्या डोळ्यांत राजकीय रंग शिरलेलाच असतो.
राजकीय मायबापांची मर्जी राखण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरायचे . बातमी बोगस का असेना? विरोधकांना जरी जाचक ठरली तरी 'साहेबां'ना आवडते ना? मग झाले. हा जर संपादकांचा दृष्टिकोन तर मग वार्ताहरांना रानच मोकळे मिळाले. याला जनहिताची रखवालीही म्हणता येणार नाही आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याची रखवालीही म्हणता येणार नाही!
आज राजकारण्यांप्रमाणेच पत्रकारांवरही लोकांचा विश्वास राहिलेला नाही व हे सगळ्यांसाठीच धोकादायक आहे.
पत्रकारांना आता स्वसंरक्षणासाठी कायदा हवा आहे, पण पत्रकारांपासून संरक्षण कोण देणार ?आगरकर व चिपळूणकरांची पत्रकारिता अधिक जहाल आणि प्रभावी होती. त्यांनी हल्ले व रोष पचवून त्यांची धारदार पत्रकारिता सुरू ठेवली. आगरकरांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली व प्रबोधनकार ठाकरे यांच्या दारात मेलेली गाढवं आणून टाकली. त्याचा बाऊ न करता त्यांनी लेखणीचे काम चालू ठेवले.
सय्यद सलिम शहजाद या पाकिस्तानी पत्रकाराचे तालिबान्यांनी आधी अपहरण केले व नंतर हत्या करून त्याचा मृतदेह फेकून दिला! त्याआधी 'वॉल स्टा्रट जर्नल'च्या डॅनियल पर्लची हत्या पाकिस्तानात झाली. त्यांचे शौर्य व त्यांचा बेडरपणाच त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला व त्यांच्या शौर्यास जगाने सलामीं दिली.
आपल्या देशात मात्र पत्रकार पैसा, बाई आणी बाटली साठी सहजपणे विकले जातात.
--
***DIL SE DESI GROUP***
You can join the group by clicking the below link or by copying and pasting it in the browser bar and then pressing 'Enter'.
http://groups.yahoo.com/group/dilsedesigroup/join/
OWNER : rajeshkainth003@gmail.com (Rajesh Kainth}
MODERATOR : sunil_ki_mail-dilsedesi@yahoo.co.in (Sunil Sharma)
MODERATOR : dollyricky@gmail.com (Dolly Shah)
MODERATOR : boyforindia@gmail.com (Mr. Gupta)
To modify your list subscription, please send a blank email to:
SUBSCRIBE : dilsedesigroup-subscribe@yahoogroups.com
UNSUBSCRIBE : dilsedesigroup-unsubscribe@yahoogroups.com
INDIVIDUAL MAILS : dilsedesigroup-normal@yahoogroups.com
DAILY DIGEST : dilsedesigroup-digest@yahoogroups.com
VACATION HOLD : dilsedesigroup-nomail@yahoogroups.com
FOR POSTING MESSAGES : dilsedesigroup@yahoogroups.com
No comments:
Post a Comment